E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सोलापुरात भाजप आणि ठाकरे शिवसेनेकडून पाकिस्तानच्या झेंड्याची होळी !
Wrutuja pandharpure
23 Apr 2025
सोलापूर
( प्रतिनिधी ) : जम्मू काश्मीर येथील पहेलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी एकत्रित येऊन पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या.शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरलेले दिसून येत होते. यावेळी बोलतांना पुरुषोत्तम बरडे म्हणाले, जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या हे निषेधार्ह असून भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारले पाहिजे.भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तत्काळ संपवले पाहिजे. आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का,अशीही शंका येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा.
शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली.भाजपच्यावतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. शिंदे सेनेच्यवतीने प्रा. शिवाजी सावंत, अमोल शिंदे व मनोज शेजवाळ यांच्या तर काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून पाकिस्तानच्या भ्याड वृत्तीचा निषेध केला गेला.
याप्रसंगी पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, दत्तात्रय वानकर, ज्ञानेश्वर सपाटे, महेश धाराशिवकर, आशुतोष बरडे, सुरेश जगताप, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, तुषार खंदारे, प्रसन्न नाजरे, धनराज जानकर, रेवण पुराणिक, लहू गायकवाड, योगेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, रविकांत गायकवाड, कृष्णा सुरवसे, बाळासाहेब माने, नाना मोरे, गजेंद्र माशाळ, शिवा कोळी, प्रशांत कदम, संभाजी कोडगे, रोहित सुरवसे, राहुल परदेशी, अण्णा गवळी, महेश गवळी, अजय अमनूर, विष्णुदास जवंजाळ, गणेश खानापुरे, संदीप भोसले, ओंकार सुतार, पंकज रणदिवे, लक्ष्मण शिंदे आदीसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती.
Related
Articles
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
13 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
13 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
13 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
13 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
10 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?